*लहुजी शक्ती सेना इंदापूर तालुकाध्यक्षपदी समाधान गायकवाड यांची निवड*
बारामती :  लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या इंदापूर तालुका अध्यक्ष पदी जांब गावचे विद्यमान सरपंच श्री समाधान गायकवाड यांची निवड एकमताने करण्यात आली. 
     असे निवडीचे पत्र बारामती येथे झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष दत्तात्रय जगताप व जिल्हा युवक अध्यक्ष पप्पू भिसे यांच्या हस्ते देण्यात आले. संघटनेकडून मिळालेल्या पदाच्या जबाबदारीच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील मातंग समाजाचे प्रश्न शासन दरबारी मांडून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करून गावोगावी संघटनेच्या शाखा उभारून संघटन वाढविणार असल्याचा ध्यास नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष समाधान गायकवाड यांनी व्यक्त केला.
    यावेळी बारामती शहर युवक अध्यक्ष आकाश पाटोळे, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन माने, बारामती तालुका सचिव अमोल इंगळे, रविभाऊ खवळे, नितीन मिसाळ, गणेश तुपे, निखिल खिलारे, सचिन सोनवणे यांसह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.