इंदापूर : इंदापूर पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांच्या विद्युत पंप, पाण्याच्या मोटारी, शेळ्या, केबल चोरीच्या घटनांची नोंद असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यात पोलीस निरीक्षक दलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्या तपास पथकाला अखेर काल (दि.२९) यश आले. 


        सविस्तर माहिती अशी इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीत शेतकऱ्यांच्या शेतीचे विद्युत पंप, पाण्याच्या मोटारी, केबल, तसेच शेळ्या चोरून नेण्याचे प्रमाण वाढले होते या घटनांची वेगवेगळ्या कलमान्वये इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले होते. याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार करून गुन्ह्याचा छडा लावण्या कामी आदेश देण्यात आले. 


               या तपास पथकाने गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळवून आरोपी सागर शिवाजी साठे राहणार काटी तालुका इंदापूर याला अकरा विद्युत पंपासह काल (दि २९) ताब्यात घेतले. 



सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक दिलीप पवार,यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक के.बी.शिंदे, माने, पोलीस हवलदार जाधव ,पोलीस नाईक कदम, कळसाईत, पोलीस नाईक गायकवाड, पोलीस नाईक हेगडे,पोलीस अंमलदार आरिफ सय्यद, अकबर शेख ,विक्रम जमादार, विनोद लोखंडे, नंदू जाधव यांनी भाग घेतला.