इंदापूर : अनुसूचित जाती - जमाती व नवबौध्द वर्गातील बेघर आर्थिक दुर्बल लोकांसाठी महाराष्ट्र मध्ये रमाई आवास घरकुल योजने अंतर्गत घरे बांधण्यासाठी निधी देऊन आर्थिक दुर्बलयांचे स्वतःचे घर बांधून अनुसूचित जाती जमाती व नवबौध्द वर्गातील लोक प्रगतीच्या दिशेने येण्यासाठी ही योजना  शासनाकडून  आर्थिक अनुदान देऊन राबवली जाते. परंतु गेल्या काही वर्षापासून शासन स्तरावर हजारो प्रस्ताव मंजुरी विना प्रलंबित असल्याने याचा विचार करून रमाई आवास योजनेतील घरकुलांना तात्काळ मंजूरी देऊन  सामाजिक न्याय मंत्री व पालकमंत्र्यांनी संबंधितविभागाला आदेश देऊन लवकरात लवकर  आर्थिक लाभ मिळवून द्यावा या आशयाचे निवेदन लहुजी शक्ती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लहूश्री विष्णूभाऊ कसबे साहेब यांच्या आदेशाने व लहुजी शक्ती सेनेचे (पू)पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाने  लहुजी शक्ती सेना इंदापूर तालुक्याच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना आज इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री विजयकुमार परीट साहेब व नायब तहसिलदार  श्री अनिल ठोंबरे साहेब यांच्या मार्फत मागण्यांचे निवेदन देण्यात आले.


    यावेळी इंदापूर ता. अध्यक्ष अजित भाऊ सोनवणे,  को.क.इं.ता.अध्यक्ष तानाजी भाऊ सोनवणे, इंदापूर तालुका उपाध्यक्ष समाधान भाऊ गायकवाड चित्रपट आघाडी तालुका प्रमुख विजय भाऊ साठे, संपर्क प्रमुख प्रदीप भाऊ तुपे , ता संघटक लखन भाऊ वायदंडे,सह संघटक हनुमंतभाऊ खुडे, ता सदस्य विनायक भाऊ घोडे, भवानीनगर अध्यक्ष सचिन भाऊ मोरे, इंदापूर शहर प्रमुख आकाश आडसुळ ,समाधान भाऊ चव्हाण,नंदू भाऊ जगताप सुनील चव्हाण यांसह अन्य उपस्थित होते.