28/04/2023 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त निळे झेंडे लावल्याच्या कारणावरून रुई ढोकी धाराशिव #उस्मानाबाद येथील , अगद_कसबे

 या तरुणास जातीवादी गाव गुंडांनी मारहाण केली होती त्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे आणि त्याच्यावर सोलापूर मधील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत..


 या घटनेतील तरुणाची आज माजी राज्यमंत्री शिवसेना सोलापुर लोकसभा सहसंपर्क प्रमुख मा.श्री.उत्तमप्रकाश_खंदारे_साहेब यांनी  भेट घेवून त्याच्या तब्येतीची चौकशी केली व सबंधित हल्लेखोरावर कायद्यान्वये सर्व गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पण 307हा कलम त्या टिकणी लावण्यात आला नव्हता तो देखिल कलम लावण्यात यावे असे  उस्मानाबादचे sp,,Dsp यांना फोन करून सुचना दिल्या त्याच्या परिवारास सांगितले सदर खटला जलद गती कोर्टात चालविला जावा असे आपण शासनाकडे मागणी करू असे ही त्यांनी सांगितले तसेच अगद कसबे याच्यावर चांगल्या पद्धतीचे सर्व उपचार करून त्याला लवकरात लवकर बरे करावे अशा सूचना ही हॉस्पिटल मधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना खंदारे साहेब यांनी दिल्या.


या वेळी सोलापुर शहर  मातंग समाज अध्यक्ष युवराज पवार रमेश बोराडे तानाजी जाधव  श्रीकांत देडे  हिराभाऊ आडगऴे शिवाजी गायकवाड़ सतीश बगाड़े प्रभाकर कांबळे व विशाल लोंढे आदिसह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.