इंदापूर : शनिवार ( दि.२२) रोजी पवित्र रमजान ईद च्या सणानिमित्त मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन रमजान ईदच्या शुभेच्छा देऊन शीरखुर्माच्या मेजवानीसाठी मुस्लिम बांधवांनी आपल्या घरी अनेक जाती धर्मांच्या लोकांना, विविध क्षेत्रातील मान्यवरां, पत्रकार बांधवांना बोलावून जातीय सलोखा व सर्व धर्म समभाव टिकण्यासाठी आमंत्रित केले.

मानव विकास परिषद च्या प्रदेश सचिव रेशमा शेख यांच्या सह अनेक मुस्लिम बांधवांच्या घरी अनेक मान्यवरांनी हजेरी लावली ,त्यावेळी रेश्मा शेख  बोलताना त्यांनी उपस्थित पत्रकारांचे आभार मानून वरील उद्गार काढले. व उपस्थित पत्रकारांचे गुलाब पुष्प व लेखणी देऊन स्वागत केले. 



सविस्तर माहिती अशी की पवित्र रमजान चे उपवास संपूर्ण महिनाभर मुस्लिम बांधवांचे असल्याने अनेक सामाजिक, राजकीय पक्ष,  सामाजिक संघटना यांनी आपापल्या परीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. याचा मागोवा घेताना अनेक पत्रकारांनी जातीय सलोखा व सर्व धर्म समभाव टिकण्यासाठी या कार्यक्रमाची प्रसिद्धी करून खऱ्या अर्थाने समाजातील जबाबदार नागरिकांबरोबरच आपली देखील ही जबाबदारी आहे असे समजलेने आज पत्रकारांचा सन्मान देखील करणे गरजेचे आहे असे उद्गार रेश्मा शेख, प्रदेश सचिव मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्य यांनी काढले. यावेळी उपस्थित पत्रकारांचा गुलाब पुष्प व लेखणी देऊन सन्मान केला.


शीरखुर्मा मेजवानीसाठी रेश्मा शेख यांच्या घरी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली, त्यात सामाजिक, राजकीय, विविध शासकीय  प्रशासनातील अधिकारी, इंदापूर पोलीस स्टेशन दक्षता समितीच्या पदाधिकारी ,अनेकांनी हजेरी लावल्याने त्यांनी सर्वांचे आभार मानले. 



रेश्मा शेख या विविध जाती धर्मातील लोकांनी एक संघ राहावे यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात, त्यासाठी सर्व महापुरुषांचे जयंती, विविध जाती धर्माचे सण ,उत्सव यामध्ये त्यांचा कायम सहभाग असतो,याच कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराबरोबरच अनेक सामाजिक संघटनांनी   विविध पुरस्काराने सन्मानित केले आहे.



 यावेळी मा.दीपक अण्णा काटे (प्रदेश सचिव भाजप युवा मोर्चा तथा संस्थापक शिवधर्म फाउंडेशन), मा.दत्ताभाऊ जगताप (महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा पुणे जिल्हा अध्यक्ष लहुजी शक्ती सेना), महिपत ( तात्या) कदम (पुणे जिल्हा सचिव,मानव विकास परिषद)

 मा.बाळासाहेब पाटोळे,सामाजिक कार्यकर्ते,  

मा. ऋषिकेश भैय्या काळे (सिने अभिनेता),  प्रकाश (बापू) आरडे  संपादक स्वराज्य न्यूज, उपस्थित होते.