डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीचे औचित्य साधून लहुजी शक्ती सेना  पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ जगताप यांच्या संकल्पनेतून लुमेवाडी लिंबोडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या गावांमध्ये भीमशक्ती व लहुजी शक्ती  सेना यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पहिली ते चौथी विद्यार्थ्यांना वह्या वाटप तसेच त्यांना खाऊ वाटप व गरजू महिलांना साड्या वाटप कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये लहुजी शक्ती सेना चित्रपट आघाडी प्रमुख विजय भाऊ साठे व लहुजी शक्ती सेना इंदापुर तालुका संघटक लखन भाऊ वायदंडे तसेच भीमशक्ती अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले ज्ञानाचा सागर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खारीचा वाटा म्हणून शिक्षणास योगदान यासाठी लहान मुलांना इयत्ता पहिली ते चौथी वह्या वाटप पेन वाटप करून आपले सामाजिक कार्य जोपासले कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान साजन साळवे योगेश वायदंडे कुदरत भैया शेख राज चव्हाण सरपंच सुनील जगताप यांनी मोलाचे सहकार्य केले

तसेच 14 व्या वित्त आयोगातून अपंगांना चेकचे वाटप देखील करण्यात आले

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषद शिक्षिका डोईफोडे मॅडम अंगणवाडी सेविका शिंदे मॅडम आशा स्वयंसेविका जगदाळे मॅडम यांच्या हस्ते संपन्न झाला

यावेळी गावातील राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष हनुमंत आबा कोकाटे विकास कुंभार सागर जगदाळे भैय्या कोकाटे पाटील नितीन भिसे दादा खरात प्रमोद बनसोडे अख्तर शेख व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते